क्रीडाई कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात मुंबईत निर्णायक बैठक : ऑनलाइन ७/१२ प्रक्रिया, भोगवटादार वर्ग-२ ते वर्ग-१ रूपांतरण आणि रेडी रेकनर फुटनोट बदलाबाबत झाली चर्चा

Kolhapur news
By -

 

             



               

                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


 क्रीडाई (CREDAI) कोल्हापूरच्या विविध प्रलंबित विषयांवर  महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात मुंबई येथे व्यापक बैठक पार पडली.आमदार अमल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली व शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.बैठकीत क्रीडाई कोल्हापूरच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. महसूल मंत्री बावनकुळे यांनी या मागण्यांची सकारात्मक दखल घेत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डाॕ.विजय राठोड व नोंदणी महानिरिक्षक रविंद्र बिंदूगडे यांना याबाबत आवश्यक ती कार्यवाही करून सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याची माहिती राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.


या बैठकीत खरेदी दस्ताची नोंदणी झाल्यानंतर सातबारा उतारा स्वतंत्र अर्ज, फेरफार नोटीस व अनावश्यक कागदपत्रांशिवाय ऑनलाइन पद्धतीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा वेळ, खर्च आणि शासकीय कार्यालयांतील दिरंगाई कमी होण्यास मदत होईल, असे नमूद करण्यात आले.स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिकांना भोगवटादार वर्ग-२ मधील जमिनी भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याबाबतच्या शासन निर्णयाचा लाभ देण्याची मागणीही करण्यात आली.

या दोन्ही विषयांवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांना तातडीने कार्यवाही करण्याबाबत मंत्रिमहोदयांनी आदेश दिले.


याशिवाय UDCPR नुसार रेडी रेकनरमधील फुटनोटमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत या पदाधिका-यांसोबत स्वतंत्र बैठक घेण्याचे आदेश नोंदणी महानिरिक्षक रवींद्र बिंदुगडे यांना देण्यात आले.

 

बैठकीला क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, महाराष्ट्र क्रेडाई चे उपाध्यक्ष विधानंद बेड़ेकर माजी अध्यक्ष महेश याधव निखिल शहा संदीप पोवार वीरेंद्रसिंहराजे घाटगे नगरसेवक  विजयेंद्र माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



  मुंबई : येथे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत क्रीडाई कोल्हापूरच्या विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करताना आमदार अमल महाडिक,शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व इतर मान्यवर

 

           ----------------------


महसूल विभागातील प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि नागरिकाभिमुख व्हावी, शासनाने ऑनलाइन व्यवस्थेला अधिक बळ देऊन अनावश्यक अडथळे दूर करावेत, तसेच स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत राहू.

           - समरजितसिंह घाटगे


               ------------------