कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आदर्श शिक्षक हा कधि निवृत्त होत नसतो. ज्ञान दान हे सर्व श्रेष्ठ ज्ञान आहे. जितके द्यावे तितके ते वाढत असते. निवृत्ती नंतर शिक्षकाने आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज सुधारण्यासाठी करावा. असे उद्गार स्वामी विवेकानंद संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे यांनी काढले.
तळेवाडी ता. गडहिंग्लज येथील सेनापती प्रतापराव गुजर हायस्कुल चे निवृत्त मुख्याध्यापक आनंदराव फराकटे यांच्या निरोप समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून स्वामींचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे ( संभाव्य उमेदवार, विधानपरिषद शिक्षक आमदार )हे होते.
आनंदराव फराकटे हे कागल तालुक्यातील चौडाळ या गावचे असल्याने त्यांचा निरोप समारंभ भडगाव फाटा (ता. कागल )येथील माऊली मंगल कार्यालयात ठेवण्यात आला होता.
आनंदराव फराकटे यांनी स्वामी विवेकानंद संस्थेच्या विविध शाळांमध्ये 34 वर्षे अध्यापन सेवा केली.पैकी तळेवाडी ता. गडहिंग्लज येथून ते निवृत्त झाले.
त्यांच्या या निरोप समारंभास शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी प्राचार्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष (जैव इंधन )शामराव देसाई,संस्थेचे माजी प्रशासकीय सहसचिव पी एस चव्हाण, बिद्री,सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, समाजसेविका सुजाता देसाई, माजी प्राचार्य व्ही. आर. भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब पाटील,यांची प्रमुख उपस्थिती होती.
------------------------


