कोल्हापूर न्यूज नेटवर्क
बाळूमामा नगर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदा सव्वाशे यांचे चिरंजीव क्षितिज सव्वाशे याची युनिव्हर्सिटी OF युरोप ( जर्मनी मध्ये) एम एस इन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल बाळूमामा नगराच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळूमामा सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोकराव चाळके होते.
प्रास्ताविक कबीर वराळे गुरुजींनी केले. तुकाराम कोळी, महेश पाटील , होनमाने सर ,आनंदा सव्वाशे यांनी सत्कारमूर्तीला शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमास माजी नगरसेवक उदय नाईक , मेजर प्रकाश पाटील , सर्जेराव शिंदे ,डॉ.सुहास पाटील, अमित लोहार , नामदेव पाेवार ,कांबळे साहेब ,परीट सर ,राजू गुडाळे ,अर्चना सव्वाशे ,राणी नाईक आदी उपस्थित होते . आभार वराळे गुरुजी यांनी मानले.
--------------------------


