ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी व्हावे - भरत रसाळे ;वित्तमंत्री अजितदादा पवार यांचेकडे मागणी

Kolhapur news
By -

 

          


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   महाराष्ट्रातील सर्वांचा लोकप्रिय व उत्साहाचा दिवाळी सण दिनांक 28 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे . त्यामुळे सर्वांची दिवाळी सुखमय होण्यासाठी माहे ऑक्टोबर 2024चे वेतन दिवाळीपूर्वी म्हणजे 25 ऑक्टोबरपर्यंत करावे व संबंधित विभागांना तसे आदेशित करावे अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत  रसाळे यांनी आज वित्तमंत्री नाम .अजितदादा पवार यांच्याकडे केली .


 याबाबतचे निवेदन ना.अजितदादा पवार यांना देणेसाठी शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभागातील शिक्षण निरीक्षक रविंद्र चौगलेयांचे कडे देण्यात आले .यावेळी उपशिक्षणाधिकारी रविंद्र ठोकळ व लेखाधिकार घनश्याम पुरेकर हे उपस्थित होते . 


हे निवेदन वित्तमंत्री ना अजित दादांचेकडे तात्काळ पाठविणेत येईल असे शिक्षण निरीक्षक रविंद्र चौगले यांनी आश्वासित केले .याबाबतचा मेलही वित्तमंत्री नाम . अजित दादा पवार यांना तसेच वित सचिव यांचेकडे कार्यालयाकड पाठविणेत  आला असल्याची माहिती समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली . 


-----------------------------