कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गतहंगामातील उसाच्या २०० रुपये दुसऱ्या हप्त्यावरून स्वाभिमानीचा पालकमंत्र्यांना इशारा देण्यात आला आहे.
गेल्यावर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता २०० रुपये मिळवा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनचे दर ४ हजार पेक्षा कमी आल्याने शासनाकडून सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलीय.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील,अजित पोवार, आप्पा एडके, बाळासाहेब पाटील यांचेसह स्वाभिमानीचे कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------------

