माळवदे यांच्या "गोवऱ्या आणि फुले" आत्मचरीत्रास मुंबईचा 'आशिर्वाद' राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur news
By -

 

         


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      मुरगूड ता. कागल येथील नामवंत लेखक, ज्येष्ठ पत्रकार व माजी संपादक चंद्रकांत माळवदे यांच्या    'गोव-या आणि फुले'  या आत्मचरीत्रास मुंबई येथील वंदना प्रकाशन तर्फे दिल्या जाणा-या, उत्कृष्ट साहित्यनिर्मिती साठीच्या 'आशिर्वाद पुरस्कारासाठी' निवड करण्यात आली आहे.


'गोव-या आणि फुले'ला मिळालेला हा तिसरा राज्यस्तर पुरस्कार असून, २०२३ सालच्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती, वंदना प्रकाशन संस्थापक, साहित्यिक डॉ. सुनील सावंत यांनी पत्राद्वारे ही माहिती कळवली आहे. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्कार स्वरुप असून, शनिवार, ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी सायंकाळी मुंबईच्या दादर माटुंगा येथील सांस्कृतिक केंद्राच्या वा. ना. गोखले सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, इंग्रजी साहित्य अभ्यासक डॉ. राजीव श्रीखंडे व आंतरराष्ट्रीय पुरस्कार सन्मानीत साहित्यिक डॉ. सुनील सावंत, या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.


               ---------------------------