थायलंड मध्ये साकारले प्रति 'दगडूशेठ' गणपती मंदिर

Kolhapur news
By -

 

           


    पुणे :श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा केवळ पुण्यातच नाही संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ह्याच लाडक्या गणपती बाप्पांची केवळ मूर्तीच नाही तर हुबेहूब मंदिरच आता थायलंड मधील फुकेत येथे उभारण्यात आले आहे ,आणि या मंदिरात दगडूशेठ गणपती बाप्पांची विधिवत स्थापना व पूजन देखील करण्यात येणार आहे.


  थायलंडमधील गणेश भक्तांसाठी ही महत्त्वाची बाब असणार आहे.  थायलंडमधील या मंदिरामध्ये केवळ मूर्तीच नाही तर हुबेहूब मंदिरच आता थायलंड मधील फुकेत या ठिकाणी येथे उभारण्यात आले आहे. या मंदिरात दगडूशेठ गणपती बाप्पांची विधिवत स्थापना व पूजन देखील करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने फुकेत मध्ये स्थापन होत असलेल्या दगडूशेठ बाप्पाच्या मूर्तीची  लाल महाल ते दगडूशेठ गणपती मंदिर अशी मिरवणूक काढण्यात आली.


दगडूशेठ गणपती मूर्तीचे विधिवत पूजन करण्यासाठी फुकेत 9 रियल इस्टेट कंपनी लिमिटेडच्या चेअरमन उद्योजिका पापा सॉन मिपा व त्यांचे सहकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्योजिका पापा सॉन मिपा यांच्या पुढाकाराने व स्व खर्चाने हे मंदिर उभे राहत आहे.  या कार्यक्रमावेळी मिस पापा सॉन मिपा म्हणाल्या, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने आम्हाला देखील शक्ती मिळते. फुकेत मध्ये मंदिर उभारणे हे अशक्यप्राय वाटत होते. मात्र, दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि भारतीयांच्या सहकार्यामुळे हे आज शक्य होत आहे. याचा आम्हाला विशेष आनंद आहे. आमचे प्रधानमंत्री देखील फुकेत मध्ये सुरु असलेले मंदिराचे कार्य पहात आहेत.

                  -----------------------------------