समरजित घाटगे यांनी घेतली संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट

Kolhapur news
By -

 


                





अंतरवाली सराटी : समरजित घाटगे यांनी आज मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली . 

 मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आम्ही त्यांच्यासोबत असून लवकरच त्यांच्या लढ्याला यश लाभो, अशी सदिच्छा  समरजित घाटगे यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आजवर आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक मराठा युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम केले असून आपला लढा आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.


भेटीनंतर समरजीत घाटगे यांनी मनोज जरांगे यांचा सत्कार केला. मनोज जरांगे आणि समरजित घाटगे या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.


दरम्यान, मराठा, मुस्लीम, दलित व मतांचे समीकरण जुळवण्यासाठी अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत मराठा, मुस्लीम, दलित समीकरणावर एकमत झाले. मतदारसंघात इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. ३ नोव्हेंबरला कोणत्या जागी कोणता उमेदवार द्यायचे हे ठरवले जाईल. एक उमेदवार निवडला जाईल. इतरांनी अर्ज मागे घेत स्टार प्रचारक म्हणून काम करायचे, असा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे. मराठा समाजाला मी एकत्र केले आहे. आता मुस्लिम आणि दलित समाजदेखील सोबत आला आहे. यामुळे समीकरण जुळले आहे. आम्ही सोबत आल्याने बदल घडेल, असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला आहे .


               ---------------------------------