भारतीय संविधानामुळेच आपल्या देशात प्रत्येक नागरिकांसाठी समता ,बंधुता, न्याय व सुरक्षितता आहे - प्रा. भाऊसाहेब कुंभार

Kolhapur news
By -

 

        



                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       नानीबाई चिखली येथील बौद्ध नगर मध्ये 75 वा संविधान दिन मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी 7.00 वा. महापुरुषांच्या प्रतिमांचे व संविधानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून सामूहिक त्रिशरण पंचशील पठण व संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. 


यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते प्रा.  भाऊसाहेब कुंभार यांनी "भारतीय संविधान- भारतीयांचा न्याय ,समता ,बंधुतेचा दीपस्तंभ "याविषयी मनोगत व्यक्त केले. "भारतीय संविधान हे कायद्याचा कायदा आहे. संविधानामुळेच आपल्या देशात गुलामगिरी जाऊन देशातील प्रत्येक नागरिकासाठी मग तो कोणत्याही जाती- धर्माचा का असेना त्याच्यासाठी समता ,न्याय बंधुतेची हमी आहे ती केवळ संविधानामुळेच त्यामुळे लोकशाहीमध्ये कोणत्याही राजकीय पक्ष्यांची सरकारे येतील किंवा जातील पण राज्यकर्त्यांना राज्यकारभार हा संविधानाच्या मार्गदर्शनानुसारच करावा लागेल त्यामुळे संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी भारतातील प्रत्येक व्यक्तीची आहे", असे विचार त्यांनी व्यक्त केले.


   या कार्यक्रम प्रसंगी पंचशील नगर, बौद्ध नगर नानीबाई  चिखली येथील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतूनही लोक उपस्थित होते. व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी सामूहिक भोजनदान देण्यात आले.

             ----------------------------