कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज येथील ११वर्षाच्या हिंदू बंजारा समाजातील बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय आरोपी शेहजाज शेख व त्याला पळून जाण्यासाठी मदत करणारा त्यांचा मालक बरकत अली पाशा यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करणारे निवेदन मुरगूड येथील हिंदूत्व वादी संघटनांनी मुरगूड पोलिस ठाण्यात ए पीआय शिवाजी करे यांना सादर केले.
तसेच मुरगूड शहरात व पोलिस ठाणे हद्दीत रोजगारा साठी वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची नोंद पोलिस ठाण्यात असणे अनिवार्य आहे.
अशा लोकांची संख्या बरीच असून त्यांच्याकडून अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा संशय आहे.छेडछाडीचे प्रकार सुध्दा त्यांच्याकडून होण्याची शक्यता आहे.
तसे प्रकार घडले तर नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया येऊन गंभीर अस्थिर परिस्थिती निर्माण होऊ शकते असे या संघटनांचे म्हणणे आहे.
बस स्थानक परिसर व कुरणी बंधारा या ठिकाणी खेड्यातून येणाऱ्या शाळकरी व महाविद्यालयिन मुलींचा वावर अधिक असतो.असे निवेदनात म्हंटले आहे.
सर्जेराव भाट,संतोष भोसले,ओंकार पोतदार,जगदीश गुरव ,संकेत शहा,अभि मिटके,रणजीत मोरबाळे,सोमनाथ यरनाळकर,तानाजी भराडे, प्रकाश पारिष्वाड,इत्यादी संघटक यावेळी उपस्थित होते.
---------------------------

