निढोरी पुलावरील रस्त्याची दुरुस्ती ; शिवभक्तांचे आंदोलन यशस्वी ; 'कोल्हापूर न्यूज' च्या वृत्ताची दखल

Kolhapur news
By -

 

       


               


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        निढोरी पुलावरील सिमेंट रस्त्याला मोठाल्या उभ्या भेगा पडल्या होत्या .रस्ता दुरुस्ती साठी शिवभक्त संघटना व नागरिकांनी आंदोलन केले.

    

    अपघात सदृश्य परिस्थिती "कोल्हापूर न्यूज "नेटवर्क ने फोटो व व्हिडिओ सह निदर्शनास आणली.

     

  परिणामी कंत्राटदार जितेंद्रसिंग ग्रुप ने त्वरित दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याची माहिती शिवभक्त सर्जेराव भाट व जगदीश गुरव यांनी दिली.

    

  प्रवासी नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले . जितेंद्र सिंग ग्रुपचे आभारही मानले.

         


             --------------------------