सर्व हॉस्पिटल्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कण्यासाठी प्रयत्नशील - ना. हसन मुश्रीफ

Kolhapur news
By -

       




     मुंबई : महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व हॉस्पिटल्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, असेही ते म्हणाले.


      मुंबईत कार्यालय प्रवेशासह मंत्री मुश्रीफ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.


           मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागल, गडहिंग्लज व उतूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला सलग सहाव्यांदा निवडून दिले आहे. तसेच; २३७ जागा जिंकत महायुतीने फार मोठे बहुमत मिळविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्रीपदाचा कार्यभार सोपविला आहे. मीही याच खात्याचा कार्यभार द्या, अशी विनंती केली होती. कारण; या आधीच्या मंत्रिमंडळात मला या खात्याचा १३ महिनेच कार्यभार मिळाला होता. त्या काळात अनेक प्रकल्प सुरू केले होते. हे प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी मी अशी मागणी केली होती. दरम्यान; या विभागांतर्गत असलेली हॉस्पिटल्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बनविण्याचे माझे स्वप्न अपुरे राहिले होते. ते पूर्णत्वाला नेण्यासाठी येत्या कार्यकाळात चांगले आणि शाश्वत जनतेच्या कायमपणे स्मरणात राहील, असे काम करू.