कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जनता शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय श्रीमान शेठ किरणभाई शाह यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी देवचंद कॉलेजमध्ये रोटरी क्लब ब्लड बँक निपाणी यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. हा उपक्रम एन.सी.सी., एन.एस.एस., स्पोर्ट्स आणि स्वयंसिध्दा या विभागांमार्फत आयोजित करण्यात आला होता.
देवचंद कॉलेज मधील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी इत्यादी मिळून एकूण 76 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले व खऱ्या अर्थाने दिवंगत अध्यक्ष मा. किरणभाई शाह यांची जयंती साजरी केली. या उपक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री आशिषभाई शाह उपाध्यक्षा सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार मु.सुबोधभाई शाह, रोटरी प्रेसिडेंट डॉ.सी.बी. कुरबेट्टी यांचे प्रोत्साहन मिळाले तर देवचंद कॉलेजचे प्राचार्या प्रोफेसर डॉ. जी. डी. इंगळे जूनियर विभागाच्या उपप्राचार्या एस. पी. जाधव पर्यवेक्षक मेजर डॉ. अशोक डोनर डॉ. प्रवीणसिंह शिलेदार, डॉ. रवींद्र चव्हाण, डॉ. अमोल नारे,डॉ सौ.आनंदी कांबळे श्री.वैभव सोनार,अंडर ऑफिसर सृष्टी पाटील, श्री.अनिकेत सूर्यवंशी, महेश चौगुले इत्यादींनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
-------------------------------


