राज्यातील ३० हजार ५०० गावांमध्ये मिळणार प्रॉपर्टी कार्ड

Kolhapur news
By -

       


      नागपूर : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारच्या महसूल विभागामार्फत येत्या २७ डिसेंबर रोजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार असून राज्यातील ३० हजार ५०० गावांमध्ये या योजनेचा लाभ नागरिकांना आपल्या हक्काची जमीन घराच्या संदर्भामध्ये मिळणार आहे. तूर्तास ग्रामीण भागात हे डिजिटल पद्धतीचे प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात शहरी भागात ड्रोन सर्वेक्षण केले जात असून त्यानंतर त्यांना देखील या स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.


केंद्र व राज्य सरकारच्या ४५ योजनांचा लाभ यातून घेता येईल यावर बावनकुळे यांनी भर दिला. स्वामित्व योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. २४ एप्रिल, २०२१ रोजी पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व (प्रधानमंत्री स्वामित्व योजना) योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून खेड्यांमधील शेतकऱ्यांची प्रत्येक जमिनीचे मोजमाप ड्रोनद्वारे केले जाईल आणि जमिनीचा मालकी हक्क असलेल्या शेतकऱ्यांना त्याचे ई- प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल. सद्यस्थितीत स्वामित्व योजना सुरवातीस महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर लागू केली गेली आहे.


                   ----------------------