नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) च्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते.
मनमोहन सिंग हे दोनवेळा देशाचे पंतप्रधान होते. त्यांना अनेक दिवसांपासून आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत होता. याआधीही प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, कर्नाटकातील बेळगावी येथे सुरू असलेली काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक रद्द करण्यात आली आहे. याशिवाय 27 डिसेंबर रोजी होणारे सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बेळगावीहून दिल्लीला रवाना झाले आहेत.
मनमोहन सिंग यांचा शैक्षणिक आणि राजकीय प्रवास...
1957 ते 1965- पंजाब विद्यापीठ, चंदीगडमध्ये शिक्षक झाले.
1969 ते 1971- दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक.
1976- जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथे मानद प्राध्यापक झाले.
1982 ते 1985- भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.
1985 ते 1987 नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.
1990 ते 1991- पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते.
1991 - नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री बनले.
1991 - आसाममधून पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले.
1996- दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक झाले.
1999- दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवली पण पराभव झाला.
2001- तिसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले आणि सभागृहात काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बनले.
2004 ते 2014- भारताचे पंतप्रधान होते.
2019-2024: सहाव्यांदा राज्यसभेचे सदस्य.
------------------------------------------

