पालकांनी मुला मुलींच्या आशा आकांक्षाकडे दुर्लक्ष करुन नये - प्राचार्य अशोक पाटोळे

Kolhapur news
By -

 


         


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        मातंग कला क्रिडा व सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने कोल्हापूर, सांगली,सातारा व बेळगांव जिल्ह्यातील मातंग व ख्रिश्चन समाज वधुवर पालक परिचय मेळावा शाहू स्मारक भवन मिनी हाॅल कोल्हापूर येथे संपन्न झाला.


    प्ररंभी छ.शिवाजी महाराज,डाॅ बाबासाहेब आंबेडकर,राजर्षि शाहू महाराज व लोकशाहीर-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पालकामधून अनुक्रमे डॉ.साने ,श्री.सदानंद भोसले,सौ.विदुला सकट व श्री.वाघ यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक ट्रस्टचे उपाध्यक्ष प्राचार्य अशोक पाटोळे यांनी केले.पालकांनी मुला मुलींच्या आशा आकांक्षाकडे दुर्लक्ष करुन नये व‌ त्यांना योग्य मार्गदर्शन करत रहावे तसेच वधुवर निवड प्रक्रियेत कांहीं अपप्रवृत्ती शिरत आहेत त्यांना अटकाव करावा असे सांगितले.ट्रस्टचे अध्यक्ष श्री शामराव शेंडगे यांनी ट्रस्टची स्थापना व कामाबाबत माहिती दिली.साहित्यिक डाॅ.उत्तम सकट , संभाजी पाटोळे, विलास मंगल, समाधान कांबळे, युवराज गायकवाड श्री.सोनुले यांनी समाजाची संघटना आवश्यक आहे.ती बांधण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करुया असे सांगितले.श्री.रमेश तिळवे व प्रा.अशोक पाटोळे यांनी आलेल्या वधुवरांचे परिचय ही  पत्रे वाचून दाखवली.सुमारे ४० ते ४५ वधूवर पालक यावेळी उपस्थित होते.दुपारी २ ते ५ या कालावधीत हा मेळावा झाला.शेवटी राष्ट्र गीताने मेळाव्याची सांगता झाली.


    मेळाव्यासाठी राजू दाभाडे सर,विलास मंगल, शामराव शेंडगे सौ.मिना जाधव यांनी मेहनत घेतली.


          ------------------------------------