मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रालयात घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक ; अधिकाऱ्यांनी १०० दिवसांचा आराखडा केला सादर

Kolhapur news
By -

 

           


        मुंबई : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले त्यानंतर हिवाळी अधिवेशन पार पडले व लगेच मंत्र्यांना खातेवाटप देखील झाले. यानंतर सरकार तातडीने कामकाजास सुरू झाले असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात महत्त्वाची बैठक घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रालयात त्यांच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कृषी, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा या विभागांच्या सचिवांची बैठक पार पडली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी 100 दिवसांचा आराखडा आणि प्रमुख योजनांची स्थिती मांडली.

           -------------------------