न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल चे स्नेहसंमेलन उत्साहात

Kolhapur news
By -

 

            



              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल चे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले.वसुंधरा वाचवा (SAVE THE EARTH) हा मुख्य संदेश संमेलनातून देण्यात आला. उद्योग धंदे , युद्धात वापरली जाणारी संहारक अस्त्रे इत्यादी मुळे हवेचे प्रदूषण होते.वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.मोबाईलच्या  अवास्तव वापरामुळे मुलांचे बिघडत चाललेले शारीरिक व मानसिक आरोग्य ,यावर आधारित मुलांनी विविध नृत्ये व नाटीका सादर केल्या .पालकांनी त्यास चांगला प्रतिसादही दिला.

    

 आपल्या नातवंडांचे कौतुक करायला प्रेक्षागृहात आलेल्या काही आजींना व्यासपिठावर बोलावून त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.दीप स्वतः रात्रभर जळतो पण इतरांना प्रकाश देतो. ज्येष्ठांची पिढी नातवंडां साठी असाच त्याग करत असते असा संदेश या दीप प्रज्वलनातून दिला आहे असे निवेदिकेने सांगितले तेंव्हा  टाळ्या वाजवून युवा पालकांनी प्रतिसाद दिला.या शिवाय  आदीराज  आणि पिया निकम या भाऊ बहिणीने सादर केलेले छ.संभाजी राजांच्या बलिदानाचे नाट्य प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेऊन गेले.

  

      सूत्रसंचालन जस्मीन जमादार यांनी केले. सुरेश सुतार यांनी संगीत साथ दिली. वंदेमातरमने संमेलनाची सांगता झाली.

    

       -----------------------------------------