मुरगूडच्या मुलींनी कर्नाटकात कुस्तीचा इतिहास रचला.

Kolhapur news
By -

 

             



              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


             बेंगलोर* येथे सुरू असलेल्या 

 *वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत* लोकनेते सदाशिवराव मंडलिक* राष्ट्रीय SAI कुस्ती संकुल मुरगूड च्या महिला कुस्तीगिरांची  4 कांस्यपदकासह ऐतिहासिक  कामगिरी करत महाराष्ट्र राज्याला *सांघिक उपविजेतेपद* मिळवून दिले.


पदक विजेत्या महिला कुस्तीगीरांची नावे पुढीलप्रमाणे ..... 


1.नंदिनी बाजीराव साळोखे 50 किलो गट कांस्यपदक 🥉

2.स्वाती संजय शिंदे 53 किलो  गट कांस्यपदक🥉

3.तन्वी गुंडेश मगदूम 59 किलो गट कांस्यपदक🥉

4.अमृता शशिकांत पुजारी 76 किलो गट कांस्यपदक 🥉

5.शिवानी बिरू मेटकर 68 किलो गट चौथे स्थान 

6.वैष्णवी रामा कुशाप्पा 72 किलो गट चौथे स्थान


प्रत्येक कुस्तीगीराने दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान,केरळ अशा वेगवेगळ्या राज्यातील प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून पदके प्राप्त केली.


या पदकामुळे चौघींना *भारतीय कुस्ती महासंघाच्या* सराव शिबिरासाठी व शिबिरा मध्ये होणाऱ्या *आशियाई, जागतिक* स्पर्धेच्या निवड चाचणी साठी पात्र झालेल्या आहेत. 


*अभिमानास्पद बाब म्हणजे*

 राज्याच्या संघात 10 कुस्तीगीरांपैकी 6 कुस्तीगीर हे *मंडलिक कुस्ती संकुलातील* महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत होते व यापैकी *चौघींनी *कांस्य पदकाची कमाई* केली 

एकाच आखाड्यातील *वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत 6 कुस्तीगीर राज्याचे प्रतिनिधित्व करणं व त्यामधील 4 कुस्तीगीरांनी पदके मिळवणं ही एक *ऐतिहासिक कामगिरी आहे.


    मार्गदर्शक


त्यांना एनआयएस आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासो लवटे ,माजी नगराध्यक्ष ,वस्ताद सुखदेव येरुडकर ,दयानंद खतकर ,सागर देसाई यांचे मार्गदर्शन 


प्रोत्साहन

 माजी खासदार.संजयदादा मंडलिक,कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक ,साई राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण , कार्यवाह आण्‍णासो थोरवत,  डॉ.प्रशांत अथणी  ( निपाणी ) ,जय शिवराय एज्युकेशन सोसायटी व मुरगूड नगरपरिषद यांचे प्रोत्साहन लाभले .




                  -------------------------