‌मुरगुड येथे तिथी प्रमाणे शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा

Kolhapur news
By -

 

           



                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा सांगणारा दिवस म्हणजे  प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांनी केलेला अफजल खानाचा वध होय.


हा दिवस  मुरगुड येथील शिवतीर्थ स्थळावर  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  मूर्तीस आदिती सूर्यवंशी  यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. दरवर्षी मुरगूडमध्ये  तिथीनुसार हा दिवस शिवप्रतापदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या प्रसंगी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी मनोगत व्यक्त केले.शिवप्रताप दिन म्हणजे  कोणत्याही मोठ्या संकटावर धैर्याने आत्मविश्वासाने व निर्धाराने मात करणे  होय.


  स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला व स्वराज्यावर आलेले मोठे संकटं उलथऊन लावले होते. स्वागत धोंडीराम परीट यांनी केले तर प्रास्ताविक विशाल सूर्यवंशी यांनी केले . पीएसआय प्रियंका वाकळे , डॉ. रेगे मॅडम, शिवभक्त सर्जेराव भाट,विजय सापळे, संजय घोडके,अमर सणगर, भिकाजी कांबळे,रोहित कोळेकर, पवन लाड , सुभाष अना वकर, केतन मगदूम,रवी शिंदे,प्रकाश हळदकर,यांच्यासह नागरिक व नगरपालिका कर्मचारी तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    शिवछत्रपतींच्या जयजयकाराने सांगता झाली.


           


          ---------------------------------------