76 व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांनी परिधान केली बांधणी पगडी

Kolhapur news
By -

 

        


      नवी दिल्ली :रविवारी, 76 व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा त्यांच्या वेशभूषेमुळे चर्चेत आले. पंतप्रधानांनी युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीद जवानांना आदरांजली वाहिली.


यावेळी त्यांनी पांढरा कुर्ता-पायजमासोबत गडद तपकिरी रंगाचा बंद गळ्याचा कोट घातला होता. याशिवाय पिवळ्या-केशरी राजस्थानी जोधपुरी बांधणी पगडी घातली होती.


प्रत्येक वेळी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या घालताना दिसतात. 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर, सलग 11 व्या वर्षी मोदी पगडी घातलेले दिसत आहेत.


             ---------------------------