कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आज रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त नानीबाई चिखलीमध्ये आजी-माजी सैनिक यांच्यावतीने भारत माता फोटो पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती शिवानी भोसले, कोल्हापूर जिल्हा आरएसएस प्रचारक गुरुप्रसाद कागवाडे ,सरपंच युवराज कुंभार ,उपसरपंच कुमार संकपाळ,राजाराम देवडकर ,मारुती संकपाळ ,बाळकृष्ण संकपाळ, विजय पाटील ,माजी सरपंच अल्लाबक्ष सय्यद व छाया चव्हाण ,माजी उपसरपंच मनीषा पाटील व विजय घस्ती, ग्रामपंचायत सदस्या ज्योती डवरी, शोभा चौगुले , जया गळतगे , सरस्वती चिखलीकर, साधना जाधव, शेतकरी दूध संस्थेचे अध्यक्ष व माजी सरपंच बाळासाहेब काटकर ,उपाध्यक्ष महादेव संकपाळ , संचालक बापूसो पाेवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन शिव प्रतिष्ठान चिखली व राम सेना यांच्यावतीने करण्यात आले.
---------------------------
डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर चिखली येथे प्रजासत्ताकदिनाचे ध्वजारोहण जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण माजी सभापती शिवानी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच युवराज कुंभार,उपसरपंच कुमार संकपाळ , माजी सरपंच हल्लाबक्ष सय्यद व छाया चव्हाण , माजी उपसरपंच विजय घस्ती, पोलीस पाटील अमृता कांबळे, ग्रामपंचायत सदस्या जया गळतगे व सरस्वती चिखलीकर ,ओमाजी कांबळे , मुख्याध्यापक अण्णासाहेब पाटील व शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------------------------
प्रजासत्ताक दिनानिमित्त कन्या विद्या मंदिर चिखलीच्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी सरपंच युवराज कुंभार,उपसरपंच कुमार संकपाळ , माजी सरपंच छाया चव्हाण, माजी उपसरपंच मनीषा पाटील , ग्रामपंचायत सदस्या जया गळतगे, शोभा चौगुले ,साधना जाधव , सरस्वती चिखलीकर, ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत कुंभार ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वरूण गुरव,उपाध्यक्षा अनुराधा प्रदीप कांबळे व सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष सचिन सूर्यवंशी, मुख्याध्यापक बाबासाहेब कांबळे व शिक्षक ,शिक्षिका उपस्थित होते .
--------------------------------------
भारत माता फोटो पूजन प्रसंगी डावीकडून चिखली पोलीस पाटील अमृता कांबळे, ग्रामपंचायत सदस्या साधना जाधव, छाया चव्हाण ,शोभा चौगुले, मनीषा पाटील, सरस्वती चिखलीकर ,ज्योती डवरी व जया गळदगे
--------------------------------------------------------




