पुणे : पवार कुटुंब एका मंगल कार्याच्या निमित्ताने एकत्र येताना दिसणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लहान सुपूत्र जय पवार हे लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी साखरपुड्याच्या पुर्वी आजोबा शरद पवार यांचा पुणे येथील घरी जाऊन आशिर्वाद घेतला.
या भेटीचे फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी जय पवारांचे लग्न निश्चित झाल्याची बातमी दिली आहे .
अजित पवारांच्या होणाऱ्या सुनबाई कोण आहेत ?
जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार कुटुबांच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे.
--------------------------------------



