ही कला जिवंत राहिली पाहिजे.

Kolhapur news
By -

 

            


       कोल्हापूर न्यूज  /  वि . रा. भोसले


     काल होळी झाली .आज धुळवड.

   लहान मुलांच्या मध्ये उत्साहाला उधाण आलेले असते.

     हालगीच्या तालावर पालखी नाचवणे हे तितके सोपे नसते.अवघ्या आठ नऊ वर्षाचा मुलगा उत्तम प्रकारे हलगी वाजवताना पाहून प्रेक्षकांनी सुद्धा तोंडांत बोटे घातली.

    "व्वा ,ही कला जिवंत राहीली पाहिजे.!"

    असे गौरवोद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले.नाणी आणि नोटांनी कलाकार मुलांचे खिसे भरून गेले.

    एका गृहस्थाने विचारले .

  "एवढे पैसे जमा झालेत ,आता त्याचे काय करणार ?  चैनी करणार ?"


    "नाही, पैसे साठवणार ,आणि नवी हलगी विकत घेणार."

     

    " अरे व्वा! मग फारच छान ."


   आता त्या मुलाच्या गळ्यात नोटांची माळ पडू लागली.

   उद्देश एकच

 ही कला जिवंत राहीली पाहिजे.

     कलावंताना  कला सादर करण्याची  संधी देणारे असे सण देखील उत्साहात साजरे झाले पाहिजेत.

   आषाढीला विठ्ठल,गोकुळाष्टमीला श्रीकृष्ण ,राम नवमीला राम आणि शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज याच मुलांनी अप्रतिम सादर केलेले असतात.

    ती नक्कल नसते.

 तीही एक कलाच असते.

  कला जिवंत राहीली पाहिजे.

    प्रत्येक जण शाहरुख, गोविंदा होऊ शकत नाही.

 निदान ती कला त्याच्या जीवनाचा आधार बनू शकते.




      ---------------------------------------------