कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक बँकेकडून निधीचा पुरवठा होत असल्याने महापुरावर कायमस्वरूपी उपाययोजना होणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Kolhapur news
By -

 

         



            कोल्हापूर न्यूज नेटवर्क


कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री ना. प्रकाश आबीटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

 

   सदर बैठकीत महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन(मित्रा) या संस्थेमार्फत प्रायमो इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टन्सी या कंपनीने महापुरावर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावरती आराखडा सादर केला. 

 


 कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक बँकेकडून निधीचा पुरवठा होत असून या माध्यमातून निश्चितच महापुरावर कायमस्वरूपी उपाययोजना होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी सांगितले


 या बैठकीला खा.धनंजय महाडिक,आ.चंद्रदीप नरके, आ. सतेज पाटील,आ.राहुल आवाडे, आ.अशोकराव माने,आ.शिवाजी पाटील,जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद सीईओ एस. कार्तिकेयन यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.


    -------------------------------------