न्यायाधीशांची निलंबित पोलीस अधिकाऱ्यासमवेत धुळवड

Kolhapur news
By -

               


बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी याच प्रकरणात निलंबित झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत धुळवडीचा आनंद लुटल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी काही फोटोही पोस्ट केलेत. त्यांच्या या दाव्यामुळे अवघे समाजमन सुन्न करणाऱ्या संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या निष्पक्ष सुनावणीवर संशय व्यक्त केला जात आहे.


      या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी या प्रकरणी निलंबित झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत धुळवड खेळल्याचा आरोप केला आहे. अंजली दमानिया एका पोस्टद्वारे म्हणाल्या, संतोष देशमुख हत्या प्रकरणात निलंबित पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील व याच प्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेल्या पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासोबत या प्रकरणाची सुनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले रंगांची उधळण करताना दिसून येत आहेत. आरोपींना वाचवणाऱ्या निलंबित अधिकाऱ्यांसोबत केस सुरू असताना न्यायाधीश होळी खेळत असतील तर हे अत्यंत चुकीचे आहे.अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये फोटो तपासून त्यांची खात्री करण्याचेही आवाहन केले आहे.



              ---------------------------