छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला विद्यार्थांचे अभिवादन

Kolhapur news
By -

 

            


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


          छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानास अभिवादन करण्यासाठी अनेक  ठिकाणी बलिदान मास पाळला जातो.

        संभाजी राजे चाळीस दिवस मृत्यूशी झुंज देत होते.इतिहासात नोंद झालेल्या त्यांच्या या मृत्यूचे स्वरूप अत्यंत भयानक होते.त्यांच्या डोळ्यात तापलेल्या लाल सळ्या खुपसल्या,नखे उपसून काढली,जीभ छाटली ,शरीराचे तुकडे केले .चाळीस दिवस ते वेदना सहन करत होते.

      हे सगळे राष्ट्राच्या हिंदवी स्वराज्याच्या अस्तित्वासाठी ,रक्षणासाठी.

     प्रा.वसंत कानेटकर यांनी या बलिदानावर इथे ओशाळला मृत्य हे नाटक  लिहिले आहे.अंगावर शहारे आणणाऱ्या या बलिदानाचा इतिहास छावा चित्रपटाने तर देशभर पोचवला. 

     शालेय विद्यार्थ्यां मध्ये सुद्धा बलिदान मासाचे लोण पसरले आहे.त्यांच्या मना मनात स्वातंत्र्य प्रेमाची लाट निर्माण झाली आहे.

     मास सुरू झाल्या पासून ती मुले शाळेत अनवाणी येतात.बाहेरचे कांहीही खात नाहीत ,गोड पदार्थ वर्ज्य केले आहेत.जयघोष करायचा नाही. 

     राष्ट्रावर प्रेम करायला शिकवणारा हा बलिदान मास म्हणजे मोठा संस्कार आहे.विशेष म्हणजे त्यांच्या पालकांनी सुद्धा त्यांना सहमती दिली आहे.

    न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मुरगूड या शाळेच्या २२ विद्यार्थी विद्यार्थिनींनी यात सहभाग नोंदवला आहे.

    त्यांची नावे या प्रमाणे.आदित्य नलावडे, यश भावके ,पियुष किल्लेदार , श्लोक तेली, आयुष इंदलकर, तुषार भारमल, अविराज पाटील, सम्राट बेलवलेकर, वेदांत कुंभार, गौरेश कांबळे, पृथ्वीराज सुतार, अधिराज निकम, कुमारी विदिशा लोणकर, पिया निकम, तृप्ती पाटील, अक्षरा भारमल, नेत्रा एकल, आर्या किल्लेदार, प्रांजली भाकरे, गुंजन पोवार, गिरीजा मोरस्कर, प्रनौती तेली.

     सोबत अध्यक्ष व्ही, आर भोसले, प्राचार्या जस्मिन जमादार, कला शिक्षक सुरेश सुतार.


-----------------------------------------------