कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पाणी पिऊन फेकलेल्या रिकाम्या बाटल्या,प्लास्टिक अविनाशी कचरा ,फाटक्या कपड्यांचे बोळे असं बरंच काय काय यामुळे मूरगुडचा दत्त घाट गुदमरून गेला होता.सकाळ संध्याकाळची नदीकाठची स्वच्छ हवा मिळते म्हणून अनेक लोक येथे फिरायला येतात.थकवा निघून जातो ,दत्तगुरूंचे दर्शन ही होते एवढीच त्यांची माफक अपेक्षा.पलीकडे स्मशान भूमि.जीवन आणि मृत्यू मधली अंधुकशी रेषा येथे जणू आखलेली आहे असेच वाटावे.
बेपर्वा लोकांच्या मुळे कचऱ्यात हा घाट परिसर गुदमरून गेला होता.शिवभावे जिवसेवा करायची म्हणून सकाळी सहा वाजता कांहीं शिवभक्त घाटावर जमा झाले.तीन तास खपून त्यांनी नदीपात्रातील कचरा व घाण काढून टाकली.परिसर ही स्वच्छ केला.या विनामूल्य सेवेचे कौतुक झाले.बेफिकीर वागणाऱ्या लोकांचा रागही आला.एस टी स्टँडवर बस मधून बाटल्या फेकणारे महाभाग सुध्दा आढळतात. अशा बेजबाबदार नागरिकांनीच दत्त घाटावर कचरा करून ठेवला होता.
स्वच्छतेचा विडा उचललेल्या शिवभक्तांचे नगरपरिषदेने कौतुक केले.
---------------