मुरगूड मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Kolhapur news
By -

 

        



           कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  मुरगूड मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

      शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरील शिवतीर्थ जागेत डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .


   दलितमित्र एकनाथ देशमुख यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून डॉ.आंबेडकर यांचे देशाच्या घडणीमध्ये योगदान किती मोठे होते याची माहिती दिली  .विशाल भोपळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.डॉ.आंबेडकरांच्या जयजयकारच्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.


     छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल नितांत श्रद्धा  असलेल्या   शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बाबासाहेबांची जयंती साजरी केली.शिवशक्ती व भीमशक्ती यांचा सुंदर संगम पहायला मिळाला आहे असे ओंकार पोतदार यांनी आपल्या निवेदनात सांगितले.अनिल सिद्धेश्वर यांनीही मनोगत मांडले.


     शहरातील आजी माजी नगरसेवक तसेच शिवभक्त  समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


    प्रमुख उपस्थितांमध्ये माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, माजी नगरसेवक एस. व्हि.चौगुले व दत्तात्रय मंडलिक , मारुती कांबळे,स्वच्छता निरीक्षक अमर कांबळे,मयूर आंगज,धोंडीराम परीट,संजय घोडके,स्वच्छता मुकादम दिलीप कांबळे, समाजवादी प्रबोधिनीचे बबन बारादेस्कर, राजेंद्र कांबळे, सुशांत सिद्धेश्वर,प्रकाश पारिश्वाड,अजिंक्य अर्जुने,अरुण मेंडके, अमित कांबळे,शहाजी कांबळे,मनोहर कांबळे,दत्तात्रय कांबळे,महेश कांबळे  इत्यादींचा समावेश होता.

     शिवभक्त सर्जेराव भाट यांनी सर्वांचे आभार मानून पुन्हा एकदा जयजयकाराच्या घोषणा दिल्या.



---------------------------------------