कोल्हापूर न्यूज / वि.रा.भाेसले
मुरगूड नगरपरिषदेवर भाजप शिवसेना युतीचा झेंडा फडकला आहे.नगराध्यक्षा पदी सुहासिनी देवी प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या.१० .४० पर्यंत च सर्व जागांचा निकाल कळला असून माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेखान जमादार यांचा पराभव झाला आहे.निवडणुकीचा आजचा निकाल कोल्हापूर जिल्ह्यासाठी राजकीय भूकंप ठरला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मुरगुड नगरपालिकेत शिवसेना शिंदे गट आणि संजय मंडलिक गटाने मुश्रीफ-घाटगे या महाबलाढ्य युतीला चारीमुंड्या चित केले आहे. मुरगुडमध्ये नगराध्यक्षपदी सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील विजयी झाल्या असून, शिंदे गटाने 20 पैकी तब्बल 16 जागांवर विजय मिळवून सत्ता काबीज केली आहे.
कागल आणि मुरगुडच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून कट्टर विरोधक असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे या निवडणुकीत अनपेक्षितपणे एकत्र आले होते. या 'महायुती'मुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती आणि ही निवडणूक माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरली होती. मात्र, मतदारांनी प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना नाकारत मंडलिकांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे.
मुश्रीफ यांना हा मोठा धक्का असून त्यासंबंधीची प्रतिक्रिया देताना माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील यांचे पती प्रवीणसिंह पाटील म्हणाले , की ज्यांनी आपल्याला दगा दिला त्यांना जनतेने धडा शिकवला आहे.
या निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक पूर्णपणे एकाकी पडल्याचे चित्र होते. निवडणुकीच्या तोंडावर प्रवीणसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र संजय मंडलिकांनी चाणाक्ष रणनीती आखत प्रवीणसिंह पाटील यांच्या पत्नी सुहासिनी देवी यांना आपल्या गटाकडून उमेदवारी दिली. या प्रयोगाला मुरगुडच्या जनतेने भरभरून दाद दिली असून, मंडलिकांनी मुश्रीफ आणि घाटगे या दोन्ही दिग्गजांच्या एकत्रित शक्तीला 'धोबीपछाड' दिली आहे.
निकाल पुढील प्रमाणे.
शिवसेना . १२
भाजप. ०४ bh
राष्ट्रवादी. ०३
शाहू आघाडी ०१
----------------------------------




