कोल्हापूर न्यूज नेटवर्क
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सविता प्रताप माने विजयी झाल्या आहेत.
राष्ट्रवादी - शाहू आघाडी चे 23 नगरसेवक विजयी झाले आहेत. शिवसेनाला (एकनाथ शिंदे गट) एक ही जागा मिळालेली नाही. त्यामुळे संजय मंडलिक यांना कागल मध्ये मात्र मोठा पराभव पत्करावा लागला आहे.
कागलच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून कट्टर विरोधक असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे या निवडणुकीत अनपेक्षितपणे एकत्र आले होते. या 'महायुती'मुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती, तर ही निवडणूक माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरली होती. तरीपण संजय मंडलिक यांना मुरगुड ची सत्ता राखण्यात यश मिळाले आहे.
विजयी उमेदवार खालील प्रमाणे :
सुशांत सुभाष कालेकर
मेघा गजानन माने
सतीश मुकुंद घाटगे
सारिका स्वप्नील बारड
अमित सदाशिव पिष्टे
साधना विष्णू पाटील
बाळासो गणपती माळी
रजिया अस्लम मुजावर
प्रकाश आण्णसो गाडेकर
संगिता रजपूत
प्रविण पांडूरंग काळबर
सहेरनिदा नवाज मुश्रीफ
अरुण अशोक गुरव
सुवर्णा कुमार पिष्टे
दिपक कुंडलिक मगर
पुनम शिवाजी मोरे
जयवंत कृष्णराव रावण
सुमन चंद्रकांत गवळी
उमेश आनंदा सावंत
रंजना दिलीप सणगर
अर्जुन बाबासाे नाईक
स्वरूपा सनी जकाते
मिना विलास लोटे
-----------------

