जिद्द आणि आत्मविश्वास ठेवून प्रयत्नात सातत्य ठेवल्यामुळेच यश गाठणे शक्य होते - उपशिक्षणाधिकारी आर व्ही कांबळे

Kolhapur news
By -

 

            




             कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


       जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित  जिल्हा परिषद अध्यक्ष चषक शालेय विद्यार्थी क्रीडा स्पर्धा सन 2025  - 2026  च्या बक्षीस व गुणगौरव कार्यक्रमात उपशिक्षणाधिकारी आर.व्ही.कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.दिनांक 16  ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान राजर्षी शाहू छत्रपती क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे सांघिक स्पर्धा व मैदानी स्पर्धा पार पडल्या.कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकास्तरावरील विजेते संघ व खेळाडू तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांनी आपला सहभाग नोंदविला.


    सदर स्पर्धेमध्ये राधानगरी तालुक्याला सर्वसाधारण विजेतेपद मिळवण्यात यश आले.तर करवीर  व चंदगड  तालुक्याला अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला., सरकारी शाळांतील शिक्षकांचे योगदान व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचे देखील कौतुक केले.आपणही जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्याचा अभिमान आहे असे त्यांनी सांगितले.केवळ बौद्धिक विकासावर लक्ष केंद्रित न  करता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन हेच विद्यार्थी राष्ट्र उभारणीसाठी सक्षम बनविण्याचे महान कार्य शिक्षकांनी करायचे आहे.


  क्रीडा स्पर्धांमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, टीमवर्क, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण विकसित होतात, तसेच ताणतणाव कमी होऊन एकाग्रता वाढते, जे खेळाडू आणि सामान्य व्यक्ती दोघांसाठीही खूप फायदेशीर आहे. या स्पर्धांमुळे खेळाडूंना यश-अपयश पचवण्याची शिकवण मिळते आणि खेळाडूवृत्ती (sportsmanship) विकसित होते. सांघिक खेळांमुळे इतरांसोबत मिळून काम करण्याची वृत्ती वाढते.शिस्त आणि नियमांचे पालन: खेळातील नियम आणि शिस्तीमुळे जीवनातही शिस्त लागते.वेळेचे नियोजन: उद्दिष्ट्ये ठरवून वेळेचे व्यवस्थापन करायला शिकतात.नेतृत्व गुण: संघात आणि जीवनात नेतृत्व करण्याची संधी मिळते.खेळातून आलेल्या अनुभवामुळे मानसिकदृष्ट्या कणखर बनतात.यश-अपयशामुळे आत्मविश्वास वाढतो आणि प्रेरणा मिळते.मा.कांबळे यांनी सर्व खेळाडू व संघव्यवस्थापक यांचे विशेष कौतुक केले.




     





            -----------------------------