कागल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयबाबा घाटगे व गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरीश दादा घाटगे तसेच बिद्री कारखान्याचे संचालक रणजीत मुडुकशिवाले यांनी भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
घाटगे यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपाची ताकद अजून वाढली आहे. आगामी काळातील सर्व निवडणुका अधिक ताकतीने लढू व जिंकू असा विश्वास धनंजय महाडिक यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील उपस्थित होते.
---------------------------