कोल्हापूर न्यूज नेटवर्क
क्रांतीज्योती फाउंडेशनच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार महिला शिक्षिका व विविध शासकीय परीक्षेत नावलौकिक प्राप्त केलेल्या महिला शिक्षिका व त्यांचे पाल्य यांच्या सत्काराचा सोहळा पार पडला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यामंदिर लिंगनूर शाळेच्या मुख्याध्यापिका शीला जाधव होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांती ज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष सौ. मुनिरा आवटे मॅडम यांनी, सत्कार सोहळ्याचे स्वरूप स्पष्ट करत समारंभात आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त महिला शिक्षिका , चौथी सातवी प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शक शिक्षिका , गुणवंत पाल्य , गणित प्रज्ञा परीक्षा मार्गदर्शक शिक्षिका व ऑनलाईन व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील विजेत्या शिक्षिका यांचा सत्कार होणार असल्याचे स्पष्ट केले.
पुरस्कार प्राप्त शिक्षिका :-
मुनिरा आवटे , शबाना मुजावर , सारिका कुंभार ,सुषमा मोरबाळे ,राजश्री पाटील , उज्वला सावंत
प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शक शिक्षिका :-
नूतन सकट , राजश्री माने , छाया तेली शहनाज सय्यद अर्चना भरते, सुषमा मोरबाळे
गणित प्रज्ञाशोध परीक्षा:-
मेनका मेस्त्री
चौथी प्रज्ञाशोध विद्यार्थी :-
मनस्वी अलंकार , अद्वैत जिरगे
व्हिडिओ निर्मिती स्पर्धा विजेत्या शिक्षिका
अफरोज मुल्ला , गीतांजली कमळकर
---------------------
या कार्यक्रमास सुप्रिया पाटील , अफरोज मुल्ला ,शुभांगी जाधव, विजया चव्हाण ,गुरव मॅडम ,विजया खोत ,राजश्री माने ,शितोळे मॅडम, कल्पना कुंभार , ज्योती जिरगे ,छाया मोरे ,अर्चना गोरुले, सुरेखा कांबळे यांच्यासह इतर शिक्षिका उपस्थित होत्या . सूत्रसंचालन शबाना मुजावर यांनी केले. आभार विजया चव्हाण यांनी मानले.
---------------------------------------