बाळूमामा भंडारा उत्सवात मोफत पाणी पुरवठा करणाऱ्या मुरगूडच्या टँकर मालकांचा अंबाबाई मंदिरात सन्मान.

Kolhapur news
By -

               


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     श्री बाळूमामांच्या भंडारा उत्सवात भाविकांना टँकरने मोफत पाणी पुरविणाऱ्या टँकर धारकांचा नागरिकांच्या वतीने  श्रीफळ,अंगारा, भंडारा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

 

      देवस्थानच्या कार्याध्यक्षा रागिणी खडके यांनी दूरध्वनीवरून या टँकर मालकांचे आभार मानले.

   टँकर मालक संदीप मेंडके यांचे दोन टँकर होते.ते म्हणाले की भुकेल्याला  अन्न व तहानलेल्या जल देणे याच्या इतके पुण्य ते कोणते ? श्री बाळूमामांनीं  उभ्या आयुष्यात गोरगरिबांची सेवा केली.मुक्या मेंढरांना माळरानावर चारून  झाल्यावर त्यांना पाणी पाजल्याशिवाय ते अन्नग्रहण करत नव्हते.

    आपल्या अनुयायांना सुद्धा त्यांनी तशीच शिकवण दिली होती.

   मयूर आंगज यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. बाळूमामांनी सोने,चांदी ,अलंकार यांची कधीच अपेक्षा केली नाही.गरजवंत आणि सक्तग्रस्तां साठी मात्र ते धाऊन जात असत.त्यांच्या कठोर शब्दांत कनवाळूपणा असायचा.अशा कृपाळू संतासाठी आम्हीं मोफत पाणी पुरविले म्हणजे कांहीं फार मोठे काम केले असे नाही .उलट ती सेवेतून केलेली मामांची भक्ती होती.

   इतर ही कांहीं टँकर मालकांनी आपले विचार मांडले.

     मुरगूड मध्ये असे अनेक सेवाभावी उपक्रम शिवभक्तांनी हाती घेतले आहेत .कांहीं अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी त्यांनी आंदोलनाचे मार्ग सुद्धा स्विकारले आहेत.त्या मुलांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्हीं आनंदाने पाणी पुरवठा केला असा सर्व टँकर धारकांचा सूर होता.

    मोफत जलसेवा देणाऱ्या टँकर धारकांची नावे याप्रमाणे... 

 मयूर आंगज,संदीप मेंडके(२टँकर),पंकज शिंदे,भाऊ भोसले,विक्रम गोधडे, आनंदा गोंधळी,अजित तावडे,शंकर मेंडके,आकाश आमते,सुहास चौगुले,सूरज पाटील,संदीप सुतार,संतोष आंगज,मुरगूड नगर परिषद (२टँकर),सुहास पाटील,संदीप देसाई, पवन गिरी ,सागर आडसूळ,बी.एम पाटील.

   

 शेवटी अंबाबाई आणि बाळूमामांचा  जयजयकार करण्यात आला.


   -----------------------------------