नानीबाई चिखलीत क्रांतिवीर हुतात्मा हरीबा बेनाडे यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन

Kolhapur news
By -

 

               

   
        


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क

     

     देशहितासाठी अनेक क्रांतीकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यामुळे आपण स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकतो. समाजात समता, बंधुता कायम टिकून राहण्याकरिता क्रांतिवीरांचे योगदान महत्वाचे असून त्यांच्या दाखविलेल्या मार्गावरच आपण मार्गक्रमण केले पाहिजे असे प्रतिपादन बिद्रीचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले यांनी केले. 


नानीबाई चिखलीचे सुपुत्र, थोर क्रांतिकारक हुतात्मा हरिबा बेनाडे यांचा 81 वा बलिदान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करताना ते बोलत होते. 


सुरवातीला सिदनाळ ( ता. निपाणी ) येथील हुतात्मा स्थळाचे पुजन करून तेथून क्रांतिज्योत आणण्यात आली.ही क्रांतिज्योत महालक्ष्मी मंदिरात आणली असता त्याचे पुजन सरपंच युवराज कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर क्रांतीज्योतीची गावातून शोभायात्रा काढण्यात आली. हुतात्मा स्मारक येथे ही शोभायात्रा आलेनंतर येथे हुतात्मा हरिबा बेनाडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.


 सरपंच युवराज कुंभार , माजी सरपंच महंमद मुल्लाणी व  छाया चव्हाण , पोलीस पाटील अमृता कांबळे, माजी उपसरपंच विजय घस्ती , ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल नुल्ले , सयाजी भोसले ,वसंत गळतगे, आर डी तुकान. श्रीकांत देवर्षी, वैभव गळतगे, श्रीरंग पाटील,वसंत देवडकर, आजी माजी सैनिक संघटना  सदस्य चिखली, कृष्णात मगदूम , अक्काताई मुरगुडे, स्वातंत्र सैनिक पत्नी, क्रांतिवीर हुतात्मा हरिबा बेनाडे व क्रांतिवीर हुतात्मा मल्लू चौगुले स्मृतिदिन सोहळा समिती सर्व सदस्य व  ग्रामस्थ  उपस्थित होते . नजीर नाईक यांनी प्रास्ताविक केले. 


 ------------------------------------