मोफत पाठयपुस्तक उपक्रमामुळे विद्यार्थ्याचे शिक्षण सुलभ - प्रशासन अधिकारी आर. व्ही. कांबळे

Kolhapur news
By -

           



           कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या कल्पकतेने समग्र शिक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. त्याचा एक भाग म्हणून प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका कोल्हापूरच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १८८ इतक्या शाळांतील सुमारे ४२००० विद्यार्थ्यांकरिता पाठ्यपुस्तकांची विभागीय पाठयपुस्तक भांडार, बालभारती शिरोली येथून उचल करणेत आली. सदर उ‌द्घाटन कार्यक्रम प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी भांडार व्यवस्थापक रविंद्र पवार, प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, अधीक्षक सचिन जाधव उपस्थित होते.


या प्रसंगी बोलताना प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी शालेय जीवनात पाठ्यपुस्तकांचे महत्व अनन्य साधारण असून विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ करण्यात पाठ्यपुस्तकांचे योगदान मोलाचे असलेचे नमूद केले.


समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांतील इ. १ ली ते इ. ८ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप करणेत येते. शहरातील सुमारे ४२,००० विद्यार्थी पाठ्यपुस्तकांचे लाभार्थी ठरलेले आहेत. शाळानिहाय, माध्यमनिहाय, इयत्तानिहाय पाठ्यपुस्तकांचे वर्गीकरण करुन शहरातील मध्यवर्ती अशा आयर्विन खिश्चन हायस्कूल या ठिकाणी पाठयपुस्तकांचा सुरक्षितपणे साठा करणेत येत आहे. सदर पुस्तकांचे शाळानिहाय वितरण करणेचे नियोजन पूर्ण झाले असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वाटप करणेत येणार आहे. शहरातील इ. १ ली ते ८ वी च्या लाभार्थ्यांकरिता एकूण २६४५५६ इतक्या प्रती आवश्यक असून त्याचे वजन जवळपास ५९ टन इतके भरणार आहे. वाहतुकीदरम्यान अथवा अवकाळी पावसामुळे  पुस्तकांचे नुकसान होऊ नये यासाठी विशेष दक्षता प्रशासनामार्फत घेणेत आलेली आहे. याकामी अविनाश लाड, राजू जगे, शांताराम सुतार यांचा मोठा सहभाग आहे. 

 या कार्यक्रमास मान्यवरांसोबतच प्राथमिक शिक्षण समितीकडील शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासो कांबळे, शहर समन्वयक राजेंद्र आपुगडे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, बालभारतीचे जालींदर गायकवाड, सांगलीचे कार्यक्रम अधिकारी संतोष ढवळे आदी उपस्थित होते.



     कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मनपा व खाजगी अनुदानित इयत्ता 1 ली ते 8 वी मधील एकूण 42,000 विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत पाठपुस्तक योजनाचा लाभ प्रसंगी बालभारती, कोल्हापूर येथून पुस्तकांचा पहिला ट्रक ताब्यात घेताना प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर चे प्रशासनाधिकारी श्री. आर. व्ही. कांबळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री. रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक श्री. बाळासाहेब कांबळे, क्रीडा निरीक्षक श्री. सचिन पांडव, विशेष शिक्षक श्री. राजेंद्र अपुगडे, सहाय्यक भांडार व्यवस्थापक रवींद्र पवार


        ------------------------------