ओंकार पोतदार यांना राज्यस्तरीय गुरुवर्य युवारत्न पुरस्कार जाहीर.

Kolhapur news
By -

          



        कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    गुरूवर्य सेवा प्रतिष्ठान कोल्हापूर या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय गुरूवर्य पुरस्काराची घोषणा  नुकतीच करण्यात आली .विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तिंना यातून गौरवित करण्यात येते.   

 

  यावर्षी राज्यस्तरीय गुरुवर्य युवारत्न पुरस्कार मुरगुड येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ओंकार पोतदार यांना जाहीर झाला आहे. पंढरपूर , जयसिंगपूर, कोल्हापूर , सांगली अशा विविध ठिकाणी हा सोहळा अत्यंत दिमाखात यापूर्वी झाला आहे .यावर्षी गुरूवर्य पुरस्कार सोहळा कोल्हापूर येथे रविवार दि. २२ जून २०२५ रोजी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .


ओंकार पोतदार यांना आतापर्यंत विविध  35 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महापूर काळात, कोरोना काळात, तसेच प्रत्येक वेळी प्रत्येक सामाजिक कार्यात नेहमी हिरिरीने सहभागी असणारे पोतदार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


            ----------------------------