परिसरात ५०० झाडे लावण्याचा मुरगूडच्या शिवभक्तांचा संकल्प .

Kolhapur news
By -

               


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


         नुकताच अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात शिवराज्याभिषेक सोहळा मुरगूड येथे संपन्न झाला. रयतेच्या राजाला अभिवादन म्हणून परिसरात ५०० झाडे लावण्याचा संकल्प येथील शिवभक्तांनी सोडला आहे.त्याची सुरुवात मुरगूड पोलीस ठाणे परिसरातून झाली.


पोलिस ठाण्याचे  एपीआय शिवाजी करे यांच्या हस्ते पहिले वृक्षारोपण करण्यात आले.शहराच्या पूर्वेला  असलेल्या शिवगड या आध्यात्मिक केंद्राच्या निसर्गरम्य परिसरात २५  झाडे लावण्यात आली.


   शहर परिसरात ठीक ठिकाणी अशी झाडे लावण्यात येतील.शेतकरी,विद्यार्थी ,व अन्य नागरिक यांनाही तसे आवाहन करण्यात येईल.


  झाडे लाऊ झाडे जगवू हे घोषवाक्य प्रत्यक्षात साकारण्याचे या युवकांनी ठरविले आहे.मुरगूड नगरपरिषदेने सर्व सहकार्य देण्याचे ठरविले आहे.


     पुढील शिवभक्तांनी यात पुढाकार घेतला आहे. सर्जेराव भाट,जगदीश गुरव,ओंकार पोतदार,तानाजी भराडे . 


             -----------------------