कोल्हापूर न्यूज नेटवर्क
ए आय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ही बसेस लवकरच एसटीच्या ताब्यात दाखल होतील असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
बस चालकाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. हे कॅमेरे ए आय तंत्रज्ञानावर आधारित असतील. बस चालक जांभई देत असेल किंवा मोबाईलवर बोलत असेल तर त्याची सूचना पाठीमागील प्रवाशांना लगेच मिळू शकते.
अचानक लागलेल्या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी फोम बेस अग्निशामक प्रणाली सुद्धा बसमध्ये असेल.
स्वारगेट येथील अप्रिय घटनेनंतर एस.टी.ने अशा सर्व खबरदारी घेतल्या आहेत.
परिवहन खात्याचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी ही माहिती दिली.
-------------------