कोल्हापूर न्यूज नेटवर्क
दक्षिण आफ्रिकेतील जगातील सर्वात जुनी आणि अत्यंत खडतर समजली जाणारी ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ ही ९० किलोमीटरची शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या कोल्हापूरच्या १२ धावपटूंनी एक अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. elevation १२०० मीटर, सात मोठे डोंगर व तीव्र हवामान बदल अशा आव्हानांना सामोरे जात, त्यांनी फक्त शरीर नव्हे तर मन व इच्छाशक्तीचीही कसोटी यशस्वीरित्या पार पाडली. या १२ धावपटूंमध्ये दोन महिलांचाही समावेश असून, त्यांच्या धाडसाने कोल्हापूरच्या क्रीडा संस्कृतीला नवा आयाम दिला आहे.
या धावपटूंनी खासदार शाहू छत्रपती यांची भेट घेऊन आपले अनुभव त्यांच्यासमोर मांडले. खासदार शाहू छत्रपती यांनी या कामगिरीचे विशेष कौतुक करत सर्व धावपटूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हे केवळ वैयक्तिक विजय नव्हते, तर परस्परांना प्रेरणा देत, संघभावनेने मिळवलेले यश होते, जे संपूर्ण कोल्हापूरसाठी गौरवाची बाब ठरले आहे.
-----------------------