निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण वर्गास प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांची भेट

Kolhapur news
By -

 

            


     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     "शिक्षकांना शिक्षण सेवेसाठी आवश्यक प्रेरणा व ऊर्जा मिळवून देण्यासाठी निवड वेतनश्रेणी  प्रशिक्षण उपयुक्त आहे." असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केले.

    महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील सभागृहात आयोजित निवड वेतन श्रेणी दहा दिवसीय सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षण उच्च माध्यमिक गट वर्गास त्यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.

 

 "शिक्षण क्षेत्रातील आवश्यक असणारे नवविचार,बदल व वेगळेपणा समजून घेणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे." असे प्रतिपादन माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी केले.

   

 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील सभागृहात आयोजित निवड वेतन श्रेणी दहा दिवसीय सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षण उच्च माध्यमिक गट वर्गास त्यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.केंद्र समन्वयक प्रा.एस.आर.वावरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर अधिव्याख्याता अश्विनी पाटील यांनी मार्गदर्शन केले.मेन राजाराम ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ.जी.व्ही.खाडे यांनी आभार मानले.

   या प्रशिक्षण वर्गात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व अभ्यासक्रम आराखडा परिचय,भारतीय ज्ञानप्रणाली,बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९,मूल्यांची रुजवणूक,शाळा मूल्यांकन,संवाद कौशल्ये विकासाच्या वाटा,शालेय संस्कृती व शालेय प्रक्रिया,नवीन आव्हाने पेलताना,रजा नियमावली, २१ व्या शतकासाठीची कौशल्ये,शालेय अभिलेखे व शासकीय योजना,शैक्षणिक संशोधन माहिती अधिकार कायदा २००५,मूल्यमापनाच्या विविध पद्धती,सेवा हमी कायदा,नेतृत्व विकास आणि प्रशासन,शालेय स्तरावरील विविध समित्या,मूल समजून घेताना,शालेय नियोजन,वर्गनिरीक्षण आदी घटकावर निवड श्रेणी केंद्र समन्वयक प्रा.एस. आर.वावरे (दूधसाखर महाविद्यालय,बिद्री),प्रा. एम.बी.मोहिते (डी.सी. नरके महाविद्यालय, कुडित्रे),प्रा.एम.वाय.साळुंखे (अण्णासाहेब डांगे महाविद्यालय,हातकणंगले)प्रा.एम.डी.पाटील (राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय,कोल्हापूर) यांनी मार्गदर्शन केले.

     







कोल्हापूर :

१) येथील दहा दिवसीय सेवांतर्गत निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करताना प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर

२)वेतन श्रेणी प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करताना डायटच्या अधिव्याख्याता अश्विनी पाटील

३) केंद्र समन्वयक प्रा.एस.आर.वावरे स्वागत व प्रास्ताविक करताना

४) प्राचार्य डॉ.जी.व्ही.खाडे आभार मानताना


         ---------------------------