कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील एम जे इंटर नॅशनल स्कूल मध्ये मराठी भाषा दिन उत्साहात साजरा झाला. लोकनियुक्त नागराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी प्र. पाटील या प्रमुख पाहुण्या होत्या.
मुलींनी लेझीम नृत्य सादर करून नगराध्यक्षा व नूतन नगरसेवकांचे स्वागत केले. त्यानंतर विज्ञान प्रदर्शन व ए आय रोबोटीक या नवीन उपक्रमाचे उदघाटन केले.
मराठी दिनाचे औचित्य साधून कवि कुसुमाग्रजाना गीतांमधून मान वंदना देण्यात आली. लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी या काव्य पंक्तीनी त्यांच्या स्मृती जागवण्यात आल्या.याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मराठी राष्टभक्तिपर गीते, मराठी लावण्या, कोळी नृत्ये असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी धोंडीराम मकानदार हे होते.
सत्कार मूर्ती मध्ये पुढील मान्यवरांचा समावेश होता. उपाध्यक्षा श्रीमती रेखाताई मांगले, नगरसेवक सुहास खराडे, दत्ता मंडलिक, सत्यजित पाटील, राजू आमते, रणजित भारमल, राहुल शिंदे, श्रीमती फर्नांडिस, सौ . गोधडे,, कोजीमाशी चे चेअरमन अविनाश चौगुले, मुरगूड पत्रकार संघांचे अध्यक्ष महादेव कानकेकर, जेष्ठ पत्रकार प्राचार्य वि. रा. भोसले इत्यादी.जावेद मकानदार यांनी आभार मानले. सूत्र संचालन प्राचार्या सौ. जस्मिन जमादार व सौ. सारिका जाधव यांनी केले. वंदे मातरम ने सांगता झाली.
--------------------------------


