कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हिंदकेसरी योगेश दोडके कुस्ती संकुल वारजे,पुणे या ठिकाणी पार पडलेल्या १५ वर्षाखालील राज्य निवड चाचणीतून लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय SAI कुस्ती संकुल, मुरगूडच्या
१.कु.सोनाक्षी अर्जुन कदम ५४ किलो वजन गट सुवर्णपदक
२. कु.ज्ञानेश्वरी यल्लाप्पा पाटील ६६ किलो वजन गट सुवर्णपदक
प्रेक्षणीय कुस्त्या करत दोघींनी सातारा, सांगली, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातील प्रतिस्पर्धी कुस्तीगीरांना आपापल्या गटामध्ये पराभूत करून
सेलम,तमिळनाडू या राज्यात दि.२७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
दोघींची पण राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पहिल्यांदाच निवड झालेली आहे.
दोघेही विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील या निवडीचे साई च्या सर्व व्यवस्थापन मंडळाने, नगरपरिषदेने व कुस्ती प्रेमी नागरिकांनी कौतुक व अभिनंदन केले.
-----------------------

