बाळूमामा नगर मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Kolhapur news
By -

 

           



       कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


           निपाणीतील बाळूमामानगर मधील दहावी बारावी सीईटी ,जेईई ,आयआयटी साठी निवड विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार नगरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आला .

 

प्रांजल महेश पाटील - बारावी सीईटी पास

यश भाऊसाहेब सकट - मुंबई आयआयटी मध्ये निवड

 प्रज्ञा शशिकांत तोडकर -   बारावी पास

आयुष उदय नाईक   -       बारावी पास

यश युवराज खापरे    -      दहावी पास

 देवकी अनंत घोळवे -      बारावी पास

 यश सागर पाटील -         दहावी पास


   या विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार नगरातील ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त पोस्टमास्तर अशोकराव चाळके ,  सेवानिवृत्त मुख्याध्यापक व साहित्यिक कबीर वराळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदा सव्वाशे सर , नगरसेवक उदय नाईक , महेश पाटील सर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .


यावेळी बोलताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदा सव्वाशे सर म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. आता पुढील शिक्षणासाठी योग्य दिशा निवडणे गरजेचे आहे.एकदा दिशा चुकली की करिअर अडचणीत येते. त्यामुळे अचूक दिशा निवडावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले . यावेळी कबीर वराळे , महेश पाटील , युवराज खापरे, सरिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .  


 या कार्यक्रमास अनंत घोळवे , पडळकर व्ही ए ,पाटील व्ही एस ,खापरे वाय बी , तोडकर एस आय , पवार एन डी , राणी नाईक , नूतन सकट ,नंदीनी खापरे, सरीता पाटील ,अर्चना सव्वाशे , महादेवी पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आनंदा सव्वाशे यांनी केले. 


            --------------------------