शाहू महाराजांच्या विचारांची जोपासना करणे काळाची गरज - ॲड. श्रीकांत माळकर

Kolhapur news
By -

 

         


          कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       "सामाजिक समतेचे उपासक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची जोपासना करणे काळाची गरज आहे." असे प्रतिपादन ॲड. श्रीकांत माळकर यांनी केले.


   हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.प्राचार्य डॉ.निरंजन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य दयासागर मोरे होते.

    ॲड.माळकर म्हणाले,"राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक, कला,क्रीडा सांस्कृतिक व शेती क्षेत्रात मोठे योगदान दिले."


अध्यक्षीय भाषणात दयासागर मोरे म्हणाले, "बहुजन समाजाच्या विकासासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मोठे योगदान दिले."


    पर्यवेक्षक प्रा.रवींद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांच्याहस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ.निरंजन कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.


    यावेळी प्रा.रमेश पाटील,प्रा.डॉ.वंदना तांदळे,प्रा.डॉ.मोहन सावंत, प्रा. डॉ.आप्पासाहेब शेळके, प्रा.डॉ.अमर कांबळे,प्रा.दिनकर पाटील, प्रा.रवींद्र पडवळे,प्रा.डॉ.अमोल महाजन, प्रा.मनीष साळुंखे,प्रा.भीमसेन कार्वेकर, प्रा.डॉ.समीर गायकवाड,प्रा.डॉ.विकास विधाते, प्रा.रॉबर्ट बारदेस्कर आदी उपस्थित होते.प्रा. सुनीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.अरविंद वाघमोडे यांनी आभार मानले.



     
       



     


हातकणंगले- १) येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त बोलताना ॲड.श्रीकांत माळकर

शेजारी दयासागर मोरे,प्राचार्य डॉ.निरंजन कुलकर्णी,प्रा.रवींद्र पाटील आदी

२)स्वागत व प्रास्ताविक करताना प्रा.रवींद्र पाटील

३) प्रमुख पाहुणे ॲड.श्रीकांत माळकर यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ.निरंजन कुलकर्णी

४) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.दयासागर मोरे यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ.निरंजन कुलकर्णी

५) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.दयासागर मोरे मार्गदर्शन करताना


         ------------------------------