कोल्हापूर न्यूज / वि रा भोसले
कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे कुतुहलाने पहावे तितके थोडेच.
मंत्रिपद मिळाले की एखाद्याला स्वर्ग दोन बोटे उरतो.कपड्यांची स्टाईल बदलते.एखादं काळं,पिवळं किंवा गुलाबी जॅकीट अंगावर चढतं. बोलण्याची स्टाईल सुद्धा बदलते.माईक हातात आला की घोषणाबाजी सुरूच.आपण काय बोलून गेलो हे टीव्ही वर कोणीतरी ट्रोल केल्यावरच त्यांना उमगतं.
"मला तसं म्हणायचं नव्हतं,विरोधक माझ्या विधानाचे राजकीय भांडवल करतात.मी शब्द मागे घेतो ."
असं कांहीतरी लीचांड मागे लाऊन घेतात.अशी नाही तरी तशी प्रसिद्धी मिळवत राहतात.
प्रकाशरावांचं मात्र तसं कांहीच नाही.ना जॅकेट ना कोट.कोपरापर्यंत घडी केलेले हातोपे , पांढरा किंवा फिक्या रंगाचा शर्ट .साधी जीन पॅट.या साध्या पोशाखाला शोभून दिसावे असे स्मित हास्य.बोलण्यात सावधपणा.जिल्हाधिकारी कचेरीत नियोजन बैठक असो की हद्द वाढ,शक्तीपीठ, आगामी महानगरपालिका निवडणुका, आरोग्य खात्याची शिबिरे,त्यांचे प्रश्न,औषधे, साथीचे आजार या सर्वांशी सतत संपर्क.
दोन्ही खासदारांशी जिव्हाळ्याचे बोलणे.वृत्तपत्रांना उगीचच एखादी हेड लाईन देण्यासारखे वक्तव्य त्यांच्या भाषणात कधि नसते.जे मुद्द्याचे असेल ते तळमळीने मांडायचे.
बहुदा पंतप्रधान मोदींचा आदर्श त्यांनी घेतलेला दिसतोय.किंवा उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचाच कित्ता गिरवलेला दिसतोय.त्यांचे इतर कांहीं मंत्री जरा झगमगताना दिसतात,पण नामदार प्रकाशराव मात्र जसे होते तसेच आजही दिसतात.
सुरुवातीला पंतप्रधान मोदी सुद्धा सूट बुटात परदेश दौरे करत असत.त्यावेळी तेवढं त्यांना जगानं स्वीकारलं नव्हतं.जेंव्हा त्यांनी पारंपारीक भारतीय पोशाख परिधान करून जगातले विविध दौरे केले तेंव्हा त्यांच्या साधेपणाचे एव्हरेस्ट गाठले .ग्लोबल लीडर अशी बिरुदावली त्यांना मिळाली आहे.भारताचा वेगळा वचक शक्तिशाली राष्ट्रांत सुध्दा निर्माण झाला आहे.अमोघ वक्तृत्व ही त्यांना मिळालेली देणगी आहे.
आपल्या पालक मंत्र्यांना ही देणगी पण मिळाली आहे.तिचा वापर करण्याची कला सुद्धा त्यांना अवगत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून केलेली निवड प्रकाश आबिटकर यांनी सार्थ केली आहे असेच म्हणावे लागेल.
एखादे साधक वाटावेत असेच ते पालक मंत्री वाटतात.
---------------------