शाहू जयंतीच्या मुहूर्तावर एम जे लकी इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवीन बसेस दाखल.

Kolhapur news
By -

              




     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       .शाहू जयंतीच्या मुहूर्तावर मुरगूड मधील एम जे लकी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थी वाहतुकीसाठी तीन नव्या बसेस दाखल झाल्या .


कागल ,भुदरगड ,राधानगरी या तीन तालुक्यातील 30 गावची मुले या शाळेत  येतात.ग्रामीण भागातील या मुलांना शाळेत येण्यासाठी वाहतुकीची सुलभ सोय नव्हती.त्यातही पावसाळ्यात तर त्यांची फारच कुचंबणा होत होती.शाहू जयंतीच्या मुहूर्तावर तीन बसेस शाळेत दाखल झाल्या.शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील मुलांना किफायतशीर पणे शिक्षण मिळाले पाहिजे असे प्रयत्न शाहू छत्रपतींनी केले होते.त्यांच्यासाठी वसतिगृहे सुध्दा त्यांनी काढली.अशा पुरोगामी विचारसरणीची प्रेरणा घेऊन उद्योजक जावेद मकानदार यांनी शाहूंच्या जयंती दिवशीच बस आणायचे ठरवले.त्यांची यथा विधी पूजा करण्यात आली.मुरगूड मधील शिवतीर्थावर या निमित्ताने लाठी ,लेझीम,तलवार बाजी इत्यादी कार्यक्रम झाले.आजी माजी नगरसेवक  ,सामाजिक कार्यकर्ते व पालकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.


  माजी नगरसेवक सुहास खराडे,संजय भारमल, व्ही.आर ,भोसले यांनी मनोगते व्यक्त केली. धोंडीराम मकानदार यांनी आभार मानले.


               -----------------------