कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आमदार जयंत आसगांकरांनी पारदर्शक आणि उपयुक्त कामातून मतदार संघ आणि मतदारांना न्याय दिला असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.
आमदार जयंत आसगावकर यांच्या निधीतून पुणे विभाग शिक्षण मतदार संघातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील 5106 शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्ही बी पाटील, दादा लाड, एसडी लाड, वाय एल खाडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, श्री शिवाजी बोर्डिंगचे अध्यक्ष बी.जी. बोराडे, माजी उपाध्यक्ष मुख्याध्यापक संघाचे व्ही.जी. पवार, प्रभाकर हेरवाडे, एस. एच. चव्हाण, जयसिंग पवार, बाबा पाटील, राजाराम वरुटे, के. के. पाटील, दत्तात्रय घुगरे, सविता पाटील, मिलिंद पांगिरकर, दत्ता पाटील, देवेंद्र कांबळे, एन. आर. भोसले, सुरेश संकपाळ, अभिजीत गायकवाड, विजय जाधव, उदय पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
----------------------------