शाहू महाराजांचे क्रांतिकारी विचार समजून घेणे गरजेचे : भरत रसाळे :डॉ. प्रशांतकुमार कांबळे राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

Kolhapur news
By -

 

         


         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांनी उपेक्षित, कष्टकरी जनसमुदायासाठी प्रचंड मोठे कार्य केले आहे. सर्वसामान्य माणसांना सन्मान मिळावा ही त्यांची भूमिका होती. समतावादी आणि मानवतावादी लोकशाही मूल्यांची त्यांनी आपल्या राज्यामध्ये रुजवणूक केल्याची दिसून येते. आपल्या राज्यातील सर्व जनता सुखी झाली पाहिजे यासाठी त्यांनी पारदर्शक राज्यकारभार निर्माण केला. सर्व जाती-धर्मातील लोकांना त्यांनी जवळ केले. त्यांचे हे क्रांतिकारी विचार समजून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भरत रसाळे यांनी केले.


ते लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना समजून घेताना या विषयावरील जाहीर व्याख्यानात राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते. यावेळी राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रूकडीचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांना राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने म्हणाले, आजच्या जात मानसिकतेमधून शाहू महाराजांचे विचार समाजाला बाहेर काढू शकतात. त्यांनी जोपासलेला मानवतावाद भारतीय समाजाने जोपासला पाहिजे.


प्रा. किसनराव कुराडे, भरत लाटकर, डॉ. श्रीपाद देसाई, डॉ. शोभा चाळके, ॲड. करुणा विमल, अंतिमा कोल्हापूरकर यांची भाषणे झाली. 


निर्मिती प्रकाशन, प्रकाशित जेष्ठ कायदेतज्ञ आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक प्रा. डॉ. श्रीपाद देसाई लिखित भारतीय संविधान का वाचावे? का वाचवावे? या महत्त्वपूर्ण सैद्धांतिक ग्रंथाचा प्रकाशन समारंभ यावेळी पार पडला. 


 लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणारे संजय मुळे, सुशांत पाटील, अनिल पोवार, ॲड. मारूती व्हनखंडे, रामचंद्र काळे, शंकर पुजारी, काशीराम बिरुणगी, ॲड. अर्चना आढाव, मिलिंद माने, रुपचंद फुलझेले, वसंतराव पाठक, डॉ. सुरेश सिरसीकर, डॉ. अपर्णा मेहता, साहेबराव अंभोरे, शाहीर भिमराव अंभोरे, सुकनंदन हांडे, संगीता कांबळे, प्रा. विष्णुदास पाटील, प्रा. विजय कोगनोळे, डॉ. वैशाली गुंजेकर, टिनुताई कराडे, ऐश्वर्या पासलकर, डॉ. माजिद बशीर मुल्ला, बापूसाहेब जगताप, विजय जमदग्नी, संजय चव्हाण, गौतम भोरे, सुषमा पुजारी, गणेश सुतार, शालिनी काटोले, सुधीर पाटोळे, श्रीमती प्रफुल्लता सातपुते, शरद गायकवाड, अनिल वीर, अपर्णा कांबळे-नांगरे, प्रदिप गायकी, सागर उशिर, अजितकुमार शेंडगे-पाटील, राजू पुजारी, श्रीमती भारती झिमरे, प्रा. जगन्नाथ आदटराव, शिरीष दिवेकर, राहुल ढेंबरे-पाटील, अक्षरस्नेही के. परमेश्वर, रजनी पाटील, अनुराधा ढवळे, डॉ. सोमनाथ पचलिंग, दिपक पवार, ॲड. संजीवनी चुंबळकर, शाहीर प्रा. हरिभाऊ भिसे, गोरखनाथ चिखलकर, आबासाहेब साबळे, कपिल घाटगे, डॉ. किशोर चौरे, जया बागुल, सुनंद भामरे, आदित्य बोरकर, प्रमोद साठे, खोब्राजी वाळवटे, राजेंद्र ढाले, सुदर्शन शिंदे, उज्वला मदने, डॉ. मीरा देठे, अमर खामकर आदी मान्यवरांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


स्वागत प्रास्ताविक डॉ. शोभा चाळके, सूत्रसंचालन वैभव प्रधान तर आभार अंतिम कोल्हापूरकर यांनी मानले.


डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांचा राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करतांना भरत रसाळे, डावीकडून डॉ. शोभा चाळके, डॉ. अमर कांबळे, डॉ. श्रीपाद देसाई, भरत लाटकर, अनिल म्हमाने, प्रा. किसनराव कुराडे, ॲड. करुणा विमल, अंतिमा कोल्हापूरकर, विश्वासराव तरटे